
हे जीवन सुंदर आहे
Life is Beautiful ♥
माझी गोष्ट

नमस्कार! 🙏🏻 माझं नाव पल्लवी गिरी आहे. मी एक भारतीय आई आहे, सध्या नेदरलँडमध्ये राहते. तुम्हा सर्वांचं मन:पूर्वक स्वागत करते या खास जागेवर – ‘हे जीवन सुंदर आहे’ या यूट्यूब चॅनेलवर.
मी भारतात वाढले. पण लग्नानंतर मी नेदरलँडमध्ये आले आणि एक वेगळं आयुष्य सुरु झालं. माझ्या मनात सतत एक प्रश्न होता— माझ्या मुलींना मी आपल्या संस्कृतीशी कशी जोडून ठेवू शकते? आणि तिथूनच या चॅनेलची सुरुवात झाली.
हा चॅनेल म्हणजे केवळ व्ह्लॉग्सचा संच नाही, तर माझं मन मोकळं करण्याचं, माझं आयुष्य, संस्कृती आणि घराच्या आठवणी तुमच्यासमोर मांडण्याचं माध्यम आहे. हळूहळू हा चॅनेल वाढत गेला, आणि आज माझं एक कुटुंबच तयार झालं आहे ज्यात तुम्ही सर्व सामील आहात.😍
My Story

Hi! I’m Pallavi, the creator behind He Jeevan Sundar Aahe.
Welcome to a heartfelt digital space where Indian tradition meets Dutch life, and everyday stories become beautiful memories. When I first moved to the Netherlands, I had many emotions—excitement, uncertainty, nostalgia, and hope. As a mother raising children abroad, I constantly asked myself— How do I pass on my roots to my kids? How do I remain connected to my culture, to my people, to myself?
This channel was born from that search. It started as a small attempt to document our lives but soon became my voice, my diary, and my connection to the wider Marathi and Indian community across the world. And that’s what this channel is about: real life, real moments, and the real joy in simplicity.
A Glimpse Into My World
चॅनेलबद्दल
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?
- परदेशातील भारतीय आईचं आयुष्य: नेदरलँडमध्ये एक आई म्हणून मी कसं आयुष्य जगते, घर चालवते, आणि मुलांना भारतीय संस्कार कसे देते हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
- सणांचं सौंदर्य – परदेशातही जपलेलं: दिवाळी, होळी, गणपती, वटसावित्री—या सणांचं घरबसल्या जतन करणं, पूजा, आरती, प्रसाद—सगळं अगदी मनापासून.
- इंडियन ग्रोसरी, बजेट आणि रेसिपीज: माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवते की नेदरलँडमध्ये भारतीय पदार्थ कुठून आणायचे, किती खर्च होतो, आणि चविष्ट रेसिपीज.
- भावना आणि आत्मकथन: कधी कधी मी फक्त बोलते—आईवडिलांच्या आठवणी, भारताची ओढ, किंवा मनातलं काही खरं खरं.
- प्रवास – युरोपातले सुंदर क्षण: मी आणि माझं कुटुंब जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही प्रवास करतो आणि तुम्हालाही त्याचा भाग बनवते.
“हे जीवन सुंदर आहे” – तत्त्वज्ञान
माझ्या दृष्टीने, ‘हे जीवन सुंदर आहे’ म्हणजेच – आयुष्य अगदी जसं आहे, तसं स्वीकारणं आणि त्यात सौंदर्य शोधणं. कधी परदेशातला एकटा दिवस, कधी मुलांबरोबर एकत्र खेळणं—या सगळ्या लहानसहान गोष्टी माझ्या साठी खूप मौल्यवान आहेत.
About The Channel
What You'll Find Here
- Life in the Netherlands as an Indian Mom: See how I manage the household, raise my kids, adjust to Dutch systems, and find Indian food in local stores.
- Festival Celebrations with Indian Soul: Diwali, Holi, Ganesh Chaturthi, Vata Savitri—every festival gets celebrated in our home with love.
- Grocery Hauls, Recipes & Practical Tips: I show where I shop, how much groceries cost, and share easy but authentic recipes.
- Reflections & Emotional Moments: These videos are raw, unscripted, and deeply personal.
- Travel Logs Across Europe: We travel whenever we can, and every trip is an adventure.
Our Philosophy: "हे जीवन सुंदर आहे"
The name of this channel comes from my belief that life is beautiful—in all its ups and downs. We don’t need big achievements to feel fulfilled. Often, the most beautiful moments are the simplest ones.
A Word From Our Community
"Your videos feel like a warm hug! It's so nice to see our culture and festivals celebrated so beautifully far from home. Thank you, Pallavi tai!"
"I learn so much from your grocery and cooking videos. It has made my life so much easier here in Europe. Keep up the amazing work!"
"The way you share your personal stories is so brave and touching. It makes me feel like I am part of your family. God bless you."
"तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटतं. परदेशात राहूनही तुम्ही आपली संस्कृती जपली आहे."
"This is my favorite channel to watch with my family. It feels like home."
"खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी चॅनेल आहे."